मालवण ता.३०-: चिंदर येथील श्री रामेश्वर विकास सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या १३ जागांसाठी ३२ अर्ज प्राप्त झाले. यासाठी २५ डिसेंबरला मतदान होणार असून भाजप विरुद्ध शिवसेनाप्रणित आघाडी अशी रंगत या निवडणुकीत पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. कर्जदार प्रतिनिधी मतदारसंघातून १९ अर्ज प्राप्त झाले आहेत. भाजपप्रणित श्री देवी भगवती पॅनेलमधून पॅनेल प्रमुख सीताराम हडकर, सुहास चिंदरकर, सदाशिव घागरे, दिगंबर जाधव, रवींद्र लब्दे, सुनील पवार, मयुरी पारकर, सुरेश पारकर, सुरेश साटम, महिला मतदार संघातून मयुरी पारकर, रश्मी पाताडे, दीक्षा वराडकर, इतर मागास वर्ग मतदार संघातून परेश चव्हाण, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून आनंद पवार तर भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदार संघातून विश्वास खरात यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर शिवसेनाप्रणित आघाडी पॅनेलमधून पॅनेलप्रमुख संजय माळकर, विल्यम फर्नांडिस, शंकर गावकर, सुधीर घागरे, उत्तम घागरे, सतीश हडकर, संजय खोत, सुनील लाड, श्रीरंग मुणगेकर, सुभाष सावंत, मिलिता फर्नांडिस, संगीता जावकर, हेमांगी खोत, नारायण कांबळी, श्रीरंग मुणगेकर, अनुसूचित जाती- जमाती मतदारसंघातून बाबुराव कासले तर भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघातून प्रकाश तोडकर इत्यादींनी अर्ज दाखल केले.
चिंदर रामेश्वर विकास संस्थेची निवडणूक २५ रोजी
