संजू परब यांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी झाली अवस्था

नगराध्यक्ष संजू परब यांना काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांना टोला

*⚡कणकवली ता.२७-:* सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपले विधान मागे घ्यावे नाही तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील शेवटी काय तर संजू परबांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी त्यांची अवस्था झाली आहे.असा इशारा काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी दिला असून कणकवली शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस यांनी आपला पाठिंबा सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजास दिला आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून टीका करताना कहा ” राजा भोज कहा गंगू तेली “असा उल्लेख केला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्यावतीने संजू परब यांचा निषेध करत आहोत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले विधान मागे घ्यावे. संजू परब यांना हि पण माहिती नसेल की त्यांच्या भाजप पक्षाचे असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा तेली समाजाचे आहेत. तरी संजू परब यांनी आपले विधान मागे घ्यावे नाही तर आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील शेवटी काय तर संजू परबांची “विनाशकाले विपरीत बुद्धि” अशी त्यांची अवस्था झाली आहे.असे काँग्रेस कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page