*⚡बांदा ता.२५-:* मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली कुडवटेम्ब येथे सुरु असलेले खड्डे बुजवण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी रोखले. मातीमिश्रित खडी खड्ड्यात घालून काम उरकून घेण्याचा ठेकेदाराचा डाव यावेळी मोडून काढण्यात आला. तर घातलेली खडी व डांबर यावेळी आक्रमक होत काढायला लावले.दरवर्षी याठिकाणी खड्डे कसे पडतात असा सवाल करत परत जर निकृष्ट दर्जाचे काम कराल तर आमच्याशी गाठ आहे असा इशारा बांधकाम विभागाचे कर्मचारी निगुडकर व ठेकेदार गावडे यांना सामाजिक कार्यकर्ते श्याम धुरी व उपस्थितांनी दिला. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदाराकरवी हाती घेतले त्या कामाची देखभाल करण्यासाठी निगुडकर यांची नेमणूक बांधकामविभागाच्या वतीने करण्यात आली मात्र त्यांच्या समोरच मातीमिश्रित खडी वापरून डांबर घालण्यात येत होत. सामाजिक कार्यकर्ते श्याम धुरी व विशांत पांगम गुरुवारी सकाळी जात असताना त्यांना त्या ठिकाणी निकृष्ट कान करत असल्याचे समोर आले त्यांनी लागलीच काम थांबवून तेथे उपस्थित निगुडकर यांना जाब विचारला.तर काम बंद पाडत अधिकारी आवटी यांचेशी फ़ोनद्वारे चर्चा केली. तर ठेकेदार आल्यानंतर त्याला चांगलेच धारेवर धरले. सर्वसामान्यांचा पैसे असे निकृष्ठ काम करून वाया घालवू नकोत. तुमच्या घरची कामे तुम्ही अशी कराल का असा सवाल निगुडकर यांना केला. जर परत असे काम कराल तर याद राखा असा इशारा हि त्यांनी यावेळी दिला. यावेळी श्याम धुरी, विशांत पांगम, नाना कळगुंटकर, अशोक सावंत, योगेश गांवकर आदीसह ग्रामस्थ, वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्सुली कुडवटेम्ब येथील खड्डे बुजवण्याचे काम स्थानिकांनी रोखले
