तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा आरोप
*⚡सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी नगरपालिकेकडून शहरात राबवण्यात येणारी स्वच्छता मोहीम हा सत्तधाऱ्यांचा दिखाऊपणा असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केला आहे. मुख्य रस्ते सोडले तर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर स्वच्छता नाही. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर देखील कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. असा देखील आरोप त्यानी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर, संतोष जोईल, असिफ ख्वाजा, झहीरा ख्वाजा, आदी उपस्थित होते.
