नगराध्यक्ष संजू परब यांची जोरदार टीका; उंची बघून टीका करा…
*⚡सावंतवाडी ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजा भोज असून, आमदार केसरकर हे गंगू तेली आहेत. त्यानी आपली उंची बघून टीका करावी, अशी जोरदार टीका नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आमदार केसरकर हे जनतेशी खोटं बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत. आतातरी त्यानी खोटे बोलून जनतेशी दिशाभूल करू नये असा सल्ला दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या आमदारापेक्षा आमचा सरपंच चांगले काम करतो, अशी टीका केली होती. परंतु, आमदार केसरकर हे त्यांनी सरपंच्यांचा अपमान केला असे सांगत दिशाभूल करत आहेत. केसरकर यांना नगराध्यक्ष पद देखील केवळ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच मिळाले होते. तर दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सांगितले होते, दिपक केसरकर यांचा पराभव म्हणजे आपला पराभव त्यामुळेच दिपक केसरकर हे आमदार होऊ शकले. परंतु, त्यानी गद्दारी करत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी देखील राजन तेली यांचा केवळ १२ हजार मतांनी पराभव झाला असून, त्यांच्याकडे पक्षाचे चिन्ह असते तर राजन तेली यांचा विजय निश्चित झाला असता. असे मत त्यानी व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या स्टॉल मध्ये नगरपालिकेचा हात नसून, बांधकाम विभागाचा हात असल्याचे खुद्द काल आमदार केसरकर यांनीच कबूल केले . यावेळी ते पुढे म्हणाले की, जो पर्यंत दिपक केसरकर आमदार आहेत. तोपर्यंत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा विकास होऊ शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. केसरकर यांनी संस्कृतीपेक्षा आता रोजगारावर बोलवे, किती युवकांना रोजगार दिला ते सांगावे असे आवाहन केले. तर येत्या काही काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५०० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी स्पष्ट केले आहे.
