शहरात जीओ चे काम सुरळीत…

हे तर राजकीय पुढाऱ्यांचे राजकारण; नगराध्यक्ष संजू परब यांची विरोधकांवर टीका

*⚡सावंतवाडी ता.२४-:* सावंतवाडी शहरात जिओ चे काम सुरळीत सुरु असून, कोणत्याही नागरिकांची त्याबाबत नगरपालिकेत तक्रार दाखल नाही. केवळ राजकीय पुढारी यावर राजकारण करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी केला आहे. यावेळी सावंतवाडीच्या विकासासाठी कितीही जणांना अंगावर घेण्यासाठी तयार असून, जीओ नेटवर्क भविष्यात महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत देखील त्यानी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page