राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी आदी पदाधिकारी होते उपस्थित
*⚡सावंतवाडी ता.२३-:* सावंतवाडी शहरात जिओ कंपनीकडून चुकीच्या पद्धतीने व मनमानी कारभारा मुळे शहरातील नागरिकांना त्रास होत असून, याबाबत आज सर्वच पक्षीय आक्रमक होत. त्यानी मुख्याधिकारी संचिता महापात्रा यांना धारेवर धरत जाब विचारला होता. तसेच यावेळी सर्वांनीच त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष देवा टेमकर आदी पदाधिकारी यांच्यासह नगरपालिकेचे बांधकाम अभियंता श्री. कुडपकर आणि श्री. राऊळ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सबंधित ठेकेदाराकडून दोन दिवसात खोदलेल्या खड्ड्यात खड्डी टाकून रस्ता पूर्ववत करण्याच्या सूचना देऊ असे पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
