*⚡कणकवली ता.२३-:* ग्रामपंचायत धालवली येथे मानसी प्रतीष्ठान व लोकाधीकार समीती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकीत्सा शिबीर आयोजित केले होते. यात ६५ नागरीकानी लाभ घेतला .यात १६ मोतीबिंदूचे रूग्ण आढळून आले होते त्यापैकी ११ रूग्णांची मोतीबींदू शस्त्रक्रीया विवेकानंद नेत्रालय कणकवली येथे करण्यात आली. यावेळी मानसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल जाधव , लोकाधिकार समीतीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी विवेकानंद नेत्र रूग्णालय कणकवलीचे डॅा. कुलकर्णी यांना धनादेश सूपूर्त केला .यावेळी उपाध्यक्ष सौ. संजना परांजपे, पोंभूर्ले सरपंच सादीक डोंगरकर, रौनक पटेल श्री कुडाळकर , सचीन सावंत ,मानसी प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच रूग्णालयाचे डॅा. तांबे व डॅा. पूनम व श्री. दादा कोरडे उपस्थीत होते. यावेळी मानसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल जाधव यांनी यापूढेही अशीच सिंधूदूर्ग जिल्हा वासियांची सेवा यथाशक्ती करत राहू असे अभिवचन दीले व आयोजकांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी मानसी प्रतिष्ठानच्या कार्यांचे कौतूक करून मोतीबींदू रूग्णांना मोफत शस्त्रक्रीया करून दिल्या बद्दल आभार मानले तसेच विवेकानंद नेत्र रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व डाॅक्टर यांचेही सहकार्याबद्दल आभार मानले.
मानसी प्रतिष्ठानतर्फे ११ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया
