नव्या वास्तूमधून नव्या संकल्पना राबवा:ना.नारायण राणे

ककणकवली पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

*⚡कणकवली ता.२३-:* कणकवली पंचायत समितीच्या या नव्या इमारतीतून जनतेचे प्रश्न सोडविले जातील. सेवक म्हणून माझा प्रत्येक सदस्य काम करेल.सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत समिती या स्वायत्त संस्था म्हणून स्थापन केल्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास प्रक्रिया नेण्याची जबाबदारी आपल्यावर दिली.कणकवली तालुक्यात एक मतांने सर्व सदस्य काम करतात जनतेच्या विकासासाठी झटतात हे पाहून समाधान वाटते.असेच काम करा, नव्या वास्तूमधून नव्या संकल्पना राबवा, जनतेचे हित तेच आपले हित आहे हे ध्यानात ठेवून नम्रपणे काम करा असे प्रतिपादन केंद्रीय सुष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. कणकवली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचा उदघाटन प्रसंगी बोलत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे बोलत होते.यावेळी माजी खासदार आणि भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे,आमदार नितेश राणे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संजना सावंत,सभापती मनोज रावराणे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,माजी सभापती तुळशीदास रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर,जिल्हा परिषद सदस्य, संजय देसाई,बांधकाम सभापती श्री.महेंद्र चव्हाण,समाजकल्याण सभापती अंकुश कदम,श्रिया सावंत,संतोष कानडे,पंचायत समिती सदस्य सौ.हर्षदा हनुमंत वाळके,सौ.सुजाता हळदिवे- राणे,सौ.भाग्यलक्ष्मी भालचंद्र साटम,राधिका सावंत,महेश लाड,सौ.स्मिता मालडीकार, गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री,दिलीप तळेकर,दिव्या पेडणेकर,तृप्ती माळवदे,सुचिता दळवी,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी सभापती प्रकाश सावंत, संजय शिरसाट आदी उपस्थित होते. नाम.राणे म्हणाले,मला कणकवली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन करण्यासाठी बोलावलात,मानसन्मान दिलात त्या बद्दल तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे.मी साहेब नाही..! जनतेचा सेवक आहे..!दिल्लीत असुद्या किंवा महाराष्ट्रात,नारायण राणे हा तुमचा सेवकच आहे आणि सेवकच राहणार .कधीही हाक द्या मी तुमच्या सेवेसाठी तत्पर असेन असे भावनिक आवाहन कणकवली तालुक्यातील जनतेला केंद्रीय सुष्म,लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. उन्हाने तापल्याशिवाय विचाराने तापता येत नाही तरी तुम्हाला उन्हात बसावे लागले त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो.असे जनतेला सांगतानाच श्री .राणे म्हणाले, सभापती,उपसभापती आणि सदस्यांनी नवीन कायदे, अधिकार आणि विकास प्रकिया समजून घेण्यासाठी नवनवीन पुस्तके वाचावीत, तरबेज सभापती, उपसभापती,सदस्य असतील तर अजूनही चांगले काम कराल. तुमचे भविष्य घडेल.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरपंच होते,माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक सभापती होते हे नेते आमदार आणि मुख्यमंत्री झाले.एक सरपंच, एक पंचायत समिती सभापती मुख्यमंत्री होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री पर्यंत पोचाल मात्र त्यासाठी मेहनत आणि जिद्द हवी असे केंद्रीय मंत्री श्री राणे यांनी सांगितले.पक्ष आपल्याला पदे देतो.ही पदे रस्ते, पाणी, विजय, शिक्षणाची व्यवस्था,शेतीसाठी लागणाऱ्या योजना राबविण्यासाठी आणि शासनाच्या योजना जनते पर्यंत पोचविण्यासाठी उपयोगात आणा.कणकवलीत जसे काम होते आहे तसे जिल्हात भाजपच्या विचारांचा प्रत्येक सदस्य आणि कार्यकर्ता करेल असा विश्वास ही यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवली नूतन इमारतीच्या आतील कारभार सुबक झाला पाहिजे,तेव्हाच इमारत सुंदर दिसेल.नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत,त्यासाठी ही इमारत आहे.यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले,त्यामुळेच पदाधिकारी त्या पद्धतीने काम करा.कणकवलीत कुठलेही मतभेद नाहीत.विकासाची जाण,जाणीव झाल्याशिवाय कामे होत नाही.कणकवली नूतन पंचायत समितीच्या इमारतीतुन लोकाभिमुख कामे करा,असा सल्ला पदाधिकऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला. आम.नितेश राणे म्हणाले, कणकवली पंचायत समितीने आजपर्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमांचे अनुकरण महाराष्ट्राने केले आहे. पंचायत समितीच्या नूतन इमारत उभारण्यासाठी असंख्य अचडचणींचा सामना सदस्य व अधिकार्‍यांना करावा लागला. मात्र, त्यांनी यावर मात करून इमारात उभारणीचे आव्हान पेलून या इमारतीची उभारणी केली आहे. ही इमारत उभारून सदस्य व अधिकार्‍यांनी एक आदर्शवत काम केले आहे. कोरोनाच्या काळातही पंचायत समितीने उत्कृष्ट काम करून जनतेची चांगली सेवा दिली. पंचायत समितीच्या सदस्यांना शासनाकडून तटपुंजा निधी दिला जात असून हा निधी वाढवून देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरवठा करणार असल्याचे सांगून कणकवली पंचायत समितीचा गावठी आठवडा बाजार सुरु करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. इमारत उभारणीच्या कामात सत्ताधार्‍यांनी आडकाठी आण्याचे काम केले असून भविष्यात होणार्‍या विकासकामांमध्ये त्यांनी आठकाठी करून घाणेरडे राजक

You cannot copy content of this page