*⚡कणकवली ता.२३-:* सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेश ऊर्फ बाळु अंधारी,तर प्रदेश प्रतिनिधी महेश ऊर्फ प्रकाश डिचोलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई टिळक भवन येथे ओबीसी सेल काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचा मेळावा झाला.यावेळी ३६ जिल्हाचा अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या पदग्रहण सोहळा संपन्न झाला, यावेळी प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी राज्यमंत्री सूनीलराव देशमुख,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.भानुदास माळी,भंडारी समाज अखिल भारतीयचे नेते नवीनशेठ बांदिवडेकर आदी उपस्थित होते.यावेळी सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून महेश ऊर्फ बाळु अंधारी साहेब,प्रदेश प्रतिनिधी महेश ऊर्फ प्रकाश डिचोलकर .महिला प्रदेश प्रतिनिधी सौ. आमिदी मेस्त्री .हेमंत करगुटकर,प्रवीण आचरेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,यावेळी सिंधुदुर्गातील जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महिंद्र सावंत,युवक काँग्रेसच्या पल्लवी तारी.ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती नीलम करगुटकर आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
सिंधुदुर्ग काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्षपदी बाळु अंधारी
