सावंतवाडी नगरपरिषदेचा देशातील दर्जा खालावला

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर : सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका

*⚡सावंतवाडी ता.२१-:* सावंतवाडी नगरपरिषद एकेकाळी देशात ६७ व्या स्थानी होती. परंतु, सद्याच्या सत्ताधाऱ्यांनी ती २५५ व्या स्थानी नेऊन ठेवली असून, हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, कारिवडे साईट वरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुमारे साडे पाच कोटी रुपयाचा असून, यातील दोन कोटी ७४ लाख रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी असून, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात ४८ लाख रुपयांचे चिरेबंदी कुंपण पूर्ण झाले असून, १९ लाख रुपयाचे गेट आणि लांड स्कॅपिंग वेट ब्रीज ८००० स्कवेर फीट फॅक्टरी शेड यासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च करून ९० टक्के काम पूर्ण झाले होते. या प्रकल्पामध्ये ७ वर्षांपूर्वी ८० नारळाची झाडे लावण्यात आली होती. परंतु ठरल्या प्रमाणे, १६० सुपारीची तर आंतरपीक म्हणून काही लिंबाची झाडे त्या पुढे सत्ताधारी लावू शकले नाहीत. असे सांगत त्यांनी राज्यात मिळालेले मार्क हे माझ्या कारकिर्दीत केलेल्या कामामुळे मिळाले असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, शहरात आज अनेक ठिकाणी कचरा अस्थव्यस्थ प्रकारे टाकलेला दिसून येत असून, एक स्वच्छ सुंदर शहर सत्ताधाऱ्यांनी दोन वर्षातच बकाल केले आहे. आज पर्यंत याच शहर वसियानी स्वच्छता अभियानात आणि स्पर्धेत नगरपालिकेला सहकार्य करत ६७ वे स्थान प्राप्त करून दिले होते. परंतु, सद्य स्थितीत नगरपालिकेत असणारे सत्ताधारी व विरोधक स्वच्छतेच्या बाबतीत शहरातील नागरिक सहकार्य करत नसल्याचा गंभीर आरोप करून, जनतेला दोष देण्याचा प्रकार करत असून, या कृत्याचा त्यानी निषेध व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page