मनसे आयोजित किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर…

फ्रेंड सर्कल जिमखाना प्रथम तर जयराम सोनार द्वितीय आणि सुधीर चव्हाण तृतीय क्रमांकाचे मानकरी

*⚡सावंतवाडी ता.२१-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात धीरज लाखे, फ्रेंड सर्कल जिमखाना याने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेला शहरवासीयांकडून उदंड प्रतिसाद मिळाला स्पर्धेत 65 जणांनी सहभाग घेतला होता.

मनसेच्या वतीने दिवाळीनिमित्त शहर मर्यादित किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला शहरवासीयांना उदंड प्रतिसाद मिळाला तब्बल 65 जणांनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला या किल्ला स्पर्धेचा निकाल आज जाहीर झाला असून यात प्रथम पारितोषिक धीरज लाखे फ्रेंड सर्कल जिमखाना, द्वितीय पारितोषिक जयराम सोनार, तृतीय पारितोषिक सुधीर चव्हाण यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ साहिल सावंत व साईश निरगुन तर लक्षवेधी किल्ला निखिल सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे या स्पर्धेचे परीक्षण विजेंद्र मांजरेकर व साईश वाडकर यांनी केले लवकरच त्यास स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित केला जाणार असून सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे तर विजेत्या स्पर्धकांचे मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले

You cannot copy content of this page