दिपक केसरकर यांच्या जीवावर निवडून येणाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करू नये…

नगराध्यक्ष संजू परब यांचे बबन साळगावकरांना प्रतिउत्तर

*⚡सावंतवाडी ता.२१-:* दिपक केसरकर यांच्या जीवावर वारंवार निवडून आलेल्या ७ वी नपास माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अभ्यास करून वक्तव्य करावं जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे. मागच्या वेळी झोन मध्ये सावंतवाडीचा नंबर ६७ वा आला होता. तर यावर्षी ३२ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर देशात २५५ वा नंबर प्राप्त केला आहे. सावंतवाडीतील जनतेने दोन वेळा तुमचे डिपॉझिट जप्त करून तुमची उंची सावंतवाडीतील जनतेने तुम्हाला दाखवून दिली आहे. असा पलटवार नगराध्यक्ष परब यांनी केला आहे. आठ वर्षात केवळ फुगे फुग्वण्याच आणि डब्बे खाण्याच काम तुम्ही केलं अशी टीका करत, मारुती मंदिरात जाऊन तुम्ही तपश्चर्या करत बसा असा सल्ला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page