Headlines

एस. टी.खाजगीकरणाचा पर्याय पुढे आल्यास अख्या महाराष्ट्र पेटून उठेल

भ्रष्ट प्रशासन आणि राजकीय लांगुलचालनामुळेच तोटा:मोहन केळुसकर

*⚡कणकवली ता.२१-:* एस. टी. कर्मचार्यांचा संप हा उत्फुत्सपणे उभा राहिलेला लढा आहे. कामगार संघटनांचे जोखंड फेकून देऊन कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. विलिनीकरणास थोडा वेळ लागेल. मात्र विद्यमान राज्यकर्ते या संपाचा फायदा घेऊन एस. टी. च्या खाजगीकरणाच्या द्दुष्टीने पाऊल उचलताना दिसत आहे. याद्दुष्टीने जर काही हालचाली झाल्यास त्याविरुद्ध महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल, असा इशारा कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी दिला आहे. एस. टी. मध्ये काही काळ नोकरी केलेल्या केळुसकर यांना या संपाच्या अनुषंगाने कामगार चळवळीतील काही नेत्यांनी संपर्क साधला. त्याअनुषंगाने त्यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, विद्यमान परिस्थितीत या संपाची वेळ चुकली आहे. तरीही या संपात कर्मचार्यांचा अनेक वर्षांचा उद्रेक उफाळून वर आला आहे. एस. टी. तोट्यात आणण्यात प्रशासनातील भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय लांगुलचालनच जबाबदार आहेत, असा आरोप या पत्रकात केला आहे. एस. टी. चा चालक, वाहक, यंत्र कारागीर आदी कनिष्ठ वर्गांला सणसुदांना फाटा देऊन वर्षाचे ३६५ दिवस रात्रंदिवस प्रवासी सेवा करावी लागत आहे. घरच्या गणपतीला, दसरा-दिवाळी आदीं सणांना तो घरी जाऊ शकत नाही. मात्र त्याबदल्यात त्यांना मिळणारा पगार लाजिरवाणा आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले, गिरणी कामगारांचा संप अद्यापही अधिक्रुतपणे संपलेला नाही. मात्र गिरणी मालकांनी राजकारण्यांशी साटेलोटे करत त्यांच्याही ९९ वर्षांच्या ब्रिटिश लिजवर असलेल्या जमीनी सोडल्यात नाहीत. त्यामुळे हक्काच्या घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या़ंना या कुकर्मामळे मुंबईत घरे मिळू शकणार नाही

You cannot copy content of this page