प्रेरणा फाऊंडेशन आणि इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन तर्फे मोफत संगणक वाटप

*⚡दोडामार्ग ता.२१ सुमित दळवी-:* प्रेरणा फाउंडेशन बदलापूर(ठाणे) महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा जिल्हा परीषद टिटवाळा येथे कॉम्पुटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कॉम्प्युटर अभावी या शाळेतील विद्यार्थ्यांचे न्यान विकसित होत नव्हते. जिल्हा परीषद शाळा टिटवाळा येथील मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी “इंटेग्रेवोन मॅनेज्ड सोल्युशन” या कंपनीच्या विदयमाने कॉप्युटर वाटपाचा कार्यक्रम प्रेरणा फाउंडेशन अंर्तगत करण्यात आला. मुलांनी पुण्याचे स्वागत ईशस्तवन व स्वागत पण गाऊंन आपल्या सुमधुर आवाजातून केले कार्यक्रमाचे आयोजन दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी संजीव जैन यांनी आयोजीत केला.सध्याचे युग हे डिजिटल झाले आहे त्यामुळे सर्वांना कॉम्पुटर चे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रेरणा फाउंडेशन व इंटिग्रेव्हॅन कंपनी चा एक छोटासा प्रयत्न यशस्वी झाला. संजीव सुरेशचंद्र जैन यांनी आतापर्यंत प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत ४५० कॉम्पुटर वाटप केले आहे, कोरोणच्या काळात गोरगरीबांना आधार दिला. या कार्यक्रमात प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्ष दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी प्रेरणा फाउंडेशन च्या कार्याची माहिती दिली. डिजिटल युगाचे महत्त्व सांगून सर्वांना मार्गदशन केले. तसेच ईंटेग्रेवोन कंपनीचे चीफ इन्फॉरमेशन ऑफिसर संजीव जैन यांनी डिजिटल युगाचे महत्त्व सांगून आलेल्या सर्व मुलांना मार्गदर्शन केले. व समाज प्रबोधनही आपल्या कवितांच्या माध्यमातून केलें या कार्यक्रमाला खजिनदार दिव्या गावकर, सचिव वैभव कुलकर्णी यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद टिटवाळा शाळेचे प्रदीप कवडूजी मरकाम मुख्याध्यापक उपस्थित होते, दिपक बाळकृष्ण इसामे सहाय्यक शिक्षक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तसेच शेलार व शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थीत होते. प्रेरणा फाउंडेशन नेहमी गोरगरिबांच्या सेवेत हजर असेल असे आश्वासन दीप्तीऊर्फ प्रेरणा गावकर यांनी दिले. आभार प्रदर्शन करून अल्पोउपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

You cannot copy content of this page