मालवण येथील भद्रकाली देवीचा वार्षिक जत्रोत्सव 22 नोव्हेंबर रोजी

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील रेवंडी येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी भद्रकालीचा वार्षिक जत्रा उत्सव दि २२ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न होणार आहे या निमित्ताने सकाळी ८ वाजल्या पासुन रात्रौ ७ वाजेपर्यत ओटी भरणे कार्यक्रम, नंतर रात्रौ १०वा श्री देवीचा पालखी सोहळा, होणार असून पालखी सोहळ्यानंतर पुन्हा देवीची ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे तर रात्रौ १२ वा बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतारी नाटक होणार पहाटे पुन्हा पालखी असून कोरोना महामारी प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे या वार्षिक जत्रोत्सवास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री भद्रकाली देवस्थान कमिटीने केले आहे

You cannot copy content of this page