*⚡मालवण ता.१७-:* मसुरे चांदेर येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर गर्भकुडी/ गाभाऱ्याच्या नूतन वास्तूचा जीर्णोद्धार सोहळा, सग्रह सवास्तु श्री ब्राह्मण देव संप्रोक्षण विधी व शिक्षर कलश प्रतिष्ठापना सोहळा दि. १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. १८ नोव्हेंबर रोजी मंदिरात सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (दिवज्योत्सव) साजरा होणार आहे. शुक्रवार दि. १९ रोजी श्री ब्राह्मणदेव मंदिराच्या कलशांचे आगमन व मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवारी दि. २० रोजी सकाळी ८.०० ते १.०० देवता गाऱ्हाणे, प्रायश्चित्त विधी, गणपती पूजन, पुण्याह वचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, आर्चा वरण, श्री ब्राह्मणदेव व परिवार देवतेवर संप्रोक्षण विधी, महाअभिषेक, महापूजस, देवता स्थापन, अग्निस्थापना, नवग्रह पूजन, वास्तू नवग्रह सहित श्री देव ब्राह्मण सपरिवार देवता हवन, वास्तूस्थापना, महानैवेद्य, आरती, महाप्रसाद होणार आहे. तर दि. २२ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० यावेळेत अवाहित देवता पूजन, मंदिराभोवती शिखर कलश सहित प्रदक्षिणा, सकाळी ८ वा. ४० मि. मुहुर्तावर कलश स्थापना, श्री ब्राह्मणदेव परिवार देवता अभिषेक व महापूजा बलिदान, पूर्णाहुति, अभिषेक, होम सांगता, नैवेद्य, आरती, जिर्णोद्धार, सांगता दुपारी १२ वाजता श्री ब्राह्मणदेव मंदिरात सालाबाद प्रमाणे वार्षिक उत्सव गोंधळाच्या कार्यक्रमाचे आरंभ, रात्रौ ८.३० वा. वार्षिक गोंधळ कार्यक्रम होणार आहे. तरी या जीर्णोद्धार समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन चांदेर नवतरुण मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
चांदेर येथील ब्राह्मणदेव मंदिर गर्भकुडी/गाभाऱ्याचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा
