भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची टीका
*⚡सावंतवाडी ता.१४-:* ज्येष्ठ नगरसेविका सौ आनारोजीन लोबो यांचे आता वय झाले असून, त्याचे शब्दावरचे वर्चस्व हळू हळू कमी होत चालल्याने, त्यांची बुद्धी भ्रष्ट होत चालली असू, त्या बेताल वक्तव्य करत असल्याची टीका भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. यावेळी ते पुढे म्हणाले आहेत की, सद्य परिस्थितीत लोबो यांना आराम करण्याची आवश्यकता असून, त्यांच्या अशा वागण्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील जनता पुढील काळात त्यांच्यावर लक्ष देणार नाहीत व पाहणार देखील नाहीत. असा खोचक टोला अजय गोंदावळे यांनी लगावला आहे.
