सावंतवाडीतील जनतेने पैसे घेऊन मतदान केल्याचा आरोप करून आमदारांनी केली सावंतवाडीकरांची बदनामी…

नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला आमदारांच्या वक्तव्याचा निषेध

*⚡सावंतवाडी ता.१३-:* सावंतवाडीतील जनतेने नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत पैसे घेऊन मतदान केले, असा गंभीर आरोप करून आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडीतील जनतेची बदनामी केली आहे. त्याच्या या वक्तव्याचा नगराध्यक्ष संजू परब यांनी निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी आमदार केसरकर यांनी डास निर्मूलन आणि पाणी निचरा साठी निधी दिला असे सांगून, सावंतवाडीच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केली आहे. असा आरोप करत, त्यानी माहितीच्या अधिकाराखाली घेतलेली माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी गेल्या चार वर्षात केवळ ३० लाख रुपये निधी आणि १३ लाख कोरोना काळात दिले असल्याचे उघड केले आहे. यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page