*⚡सावंतवाडी ता.१२-:* भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 13, 14 व 27, 28 नोव्हेंबर या दिवशी विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सावंतवाडी शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या दिवशी मतदार यादीतील नोंदी तपासून घेणे, नव्याने नांव नोंदणी करणे, मयत व दुबार मतदारांची नावे वगळणे आदी कामे करण्यात येणार आहेत. याचा मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
सावंतवाडीत 13, 14, 27, 28 ला विशेष मतदार नोंदणी शिबिर
