रस्त्यात मिळालेली पर्स केली परत

वाहतूक पोलीस आबा पिरणकर व सुनील नाईक यांनी जपली माणुसकी

*⚡सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरातील आरपीडी हायस्कूल समोर चार दिवसापूर्वी रस्त्यावर बाजारात आलेल्या पादचारी दोन महिलांना पर्स आढळून आली होती. ती पर्स वाहतूक पोलीस आबा पिळणकर त्यांच्याकडे त्याने सुपूर्त केली होती. आबा पिरणकर व सावंतवाडी वाहतूक पोलीस सुनील नाईक यांनी पर्स मध्ये असलेले बँकेचे पासबुक वरून त्या पर्सच्या मालकाचा शोध लावत, ती पर्स सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी वृषाली परांजपे त्यांची असल्याची खात्री पटवली. त्यानंतर आज शुक्रवारी सौ परांजपे यांना पर्स पोलिसांनी ताब्यात देण्यात आली आहे. सौ परांजपे ह्या आपल्या कुटुंबासमवेत बँकेत पासबुक एन्ट्री करून जात असताना त्यांच्या काखेत लावलेली पर्स गहाळ झाली होती . त्या पर्समध्ये तेराशे रुपये व बँकेचे पासबुक होते. सौ परांजपे त्यांना पर्स हरवल्याचे लक्षात येताच. त्यानी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र पर्स सापडली नव्हती. वाहतूक पोलीस आबा पिळणकर व सुनील नाईक यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक होत आहे. दोन महिन्यापूर्वी पिरणकर यांना पर्स मिळाली होती. त्याचाही त्यांनी शोध लावून पर्स मालकाला स्वाधीन केली होती. अशा प्रामाणिकपणामुळे नागरिकांचा पोलिसांवर विश्वास वाढलेला आहे. त्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दाभाडे यांनी आबा पिळणकर यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page