जुलैच्या महापुरातील नुकसानी मदत अद्याप नाही

विलवडे ग्रामस्थांची तक्रार:राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

*⚡सावंतवाडी ता.१२-:* जुलै महिन्यात आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकरी तसेच ग्रामस्थांना अद्यापही शासकीय मदत मिळाली नाही. नुकसानग्रस्तांच्या खात्यात निधी जमा व्हावा. तसेच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी विलवडे ग्रामस्थानी केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे. यावेळी नुकसानग्रस्ताना मदत मिळवून देण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिले. जुलै २०२१ मधील महापुरात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांच्या खात्यात निधी जमा करण्याबाबत, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराबाबत विलवडे ग्रामस्थांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच लक्ष वेधल. यावेळी सोमवारी याबाबत संबंधितांची बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिलं. यावेळी विनायक सावंत, विलवडे येथील पुरग्रस्त उपस्थित होते.

You cannot copy content of this page