फ्रेंच , रशियन , जर्मन व स्पॅनिश भाषेचेही कोर्स
*⚡कणकवली ता.१४-:* तरूणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व आर्थिक प्रवर्तन संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकासावर आधारीत ५० कोर्सेस जून २०२२ पासून सुरू करण्यात येणार आहेत . यासाठी पुणे येथील ‘ बार्टी ‘ या संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार आहे . यासाठी कलमठ येथे पाच गुंठे जागेत ३५०० चौरस फूटाचे बांधकाम करण्यात येत असून त्याचे भूमिपुजन करण्यात आले . येथे जॉब ओरिएंटेड कोर्स सुरू करण्याचे प्लॅनिंग दिसून दरवर्षी ६० ते ७० तरुणांना नोकरी मिळू शकेल असे प्रसिद्ध अर्थतज्ञ ,मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू , माजी खासदार डॉ . भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले . कणकवली येथील हॉटेल गोकुळधाममध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ . भालचंद्र मुणगेकर बोलत होते.ते म्हणाले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व आर्थिक प्रवर्तन संस्था ही लोकशाही मुल्य ‘ जनतेत रुजविण्यासोबत बेरोजगारी दूर करण्याबाबतही काम करते . आज एकूण बेरोजगारीचा विचार केला तर सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . केवळ पदव्या घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत . आज नोकऱ्या निर्माण होण्याचे प्रमाण थांबले आहे . १८ टक्के सुशिक्षीत बेरोजगार आहेत . यासाठी दहावी , बारावीनंतर कौशल्य विकास कोर्सेस सुरू करण्याचा संस्थेचा उद्देश आहे . ज्यापासून किमान नोकरी मिळू शकेल असे ५० कोर्सेस संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत . यासाठी डॉ . बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ( बार्टी ) या संस्थेकडून मोफत प्रशिक्षण व विद्यावेतनही दिले जाते . हे प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे . यातून दरवर्षी ६० ते ७० लोकांना नोकरी मिळू शकेल . याकरीता आपण दहा वर्षांपूर्वी कलमठ येथे घेतलेल्या जागेमध्ये ३५०० चौ . फूटचे बांधकाम करण्यात येणार आहे . त्यासाठी खासदार कुमार केतकर , हुसेन दलवाई यांनी प्रत्येकी 25 लाख अशाप्रकारे 50 लाखाचा फंड उपलब्ध झाला आहे . येथे जॉब ओरिएंटेड कोर्स सुरू करण्याचे प्लॅनिंग आहे . तसेच फ्रेंच , रशियन , जर्मन व स्पॅनिश भाषाही शिकविण्याचे कोर्सेस असतील . यात फि न घेता अथवा मोफत कोर्स सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ . भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले .
