नगरसेविका शुभांगी सुखी यांची नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे चौकशीची मागणी
*⚡सावंतवाडी ता.१०-:* विवाह नोंदणीसाठी आलेल्यांकडून तलावात बदके सोडण्यासाठी चार हजार रुपये पालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने मागितले, असा आरोप नगरसेविका शुभांगी सुकी यांनी केला.या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी नगराध्यक्षांकडे केली. नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत चौकशी करू असे स्पष्ट केले.
