राजशिष्टाचार जिल्हाधिकारी पाळत नाहीत;आम. नितेश राणे यांची टीका
*⚡कणकवली ता.०९-:* पालकमंत्र्यांना आम्ही आव्हान दिले म्हणून आता 16 नोव्हेंबर रोजी डीपीडिसीची मिटिंग लावली आहे. डीपीडिसीची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात होईल असे जर पालकमंत्री यांना वाटत असेल तर तो पालकमंत्र्यांचा भ्रम आहे कारण डीपीडिसी मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणारच असा इशारा देत आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्र्यांनी दोनवेळाच्या जेवणाचा डबाही आणावा अशा शब्दांत आगामी डीपीडिसी मिटिंगची झलक बोलून दाखवली. कणकवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,आम्हाला पालकमंत्र्यांना अडविण्याची हौस नाही, अडवणे हा हेतू सुद्धा नाही.मात्र जिल्ह्यातले प्रश्न, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी थांबवत असू आणि पालकमंत्री म्हणून ते थांबून एकूण घेणार नाहीत काय ? आणि ते थांबणार नसतील तर मग अडवावेच लागेल.असा इशारा दिला. पालकमंत्री हे डीपीडिसी चे मालक नाहीत.ते अध्यक्ष आहेत,डीपीडिसीचा निधी वाटप सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन करणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य आहे. डीपीडिसी निधी वाटपात पालकमंत्री राजकारण करत आहेत. राजशिष्टाचार जिल्हाधिकारी पाळत नाहीत.शासकीय आढावा बैठकीत कोण बसावे कोण नाही हे घटनेने सांगितलेले आहेत.ते जर पायदळी तुडवत असतील तर खपवून घेणार नाही.एसटी च्या संपाला भाजपाचा पूर्ण पाठींबा आहे. असे आम.नितेश राणे म्हणाले.
