कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याचा परिणाम;आम.नितेश राणे यांनी केला आरोप
*⚡कणकवली ता.०९-:* कोरोनातुन सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वपदावर येत आहे.मात्र ३ नोव्हेंबरपासून आजपर्यंत २ हजार आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत.असा सरकारचा गलथान कारभार असून २ हजार आरटीपीसीआर टेस्टचे काही रिपोर्ट दुदैवाने पॉझिटिव्ह आल्यास भयानक परिस्थिती निर्माण होईल याची काळजी सरकारला नाही.कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट मिळालेले नाहीत.असा आरोप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी जी खरेदी झाली त्याचे ऑडिट झाले पाहिजे.अहमदनगरमध्ये रुग्णालयाला आग लागली अशा घटना भविष्यात जिल्हा रुग्णालयात होऊ शकतात. कारण जी खरेदी कोरोना काळात झाली त्यावरच प्रश्नचिन्ह आहे. १६ कोटी, २०कोटी, २२ कोटी अशी जी खरेदी झाली आहे. त्यातील बहुतेक गोष्टी फक्त कागदावरच आहेत ,त्या साधन सामुग्री प्रत्यक्षात नाहीत.कोरोना काळात जी काय खरेदी झाली आहे त्याची एक ” श्वेत पत्रिका” निघालीच पाहिजे.आणि त्याची सुरवात सिंधुदुर्ग जिल्हापासून करावी,पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतःहून ही श्वेत पत्रिका जाहीर करावी असे आव्हान भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिले. कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार नितेश राणे म्हणाले, कोरोना काळात आम्ही आमदारांचा निधी आरोग्यासाठी दिला आहे. तो निधी आणि शासनाने दिलेला निधी यांचे खरेदी केलेल्या वस्तू आणि यंत्र सामुग्री दाखवा मात्र हे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांरी असा पारदर्शक कारभार दाखवू शकणार नाहीत.जसे वानखेडे यांच्या कपडे, बूट आणि घड्याळावर बोलता तसे खूप लोकांचे कपडे आणि गाड्या या जिल्हा रुग्णालयात तयार झालेल्या आहेत अशी घणाघाती टीका आमदार नितेश राणे यांनी केली. कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट मिळालेले नाहीत. सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार सुरू आहे.सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत. प्रशासनाकडून दररोज कोरोना टेस्ट चा दिला जाणारा आकडा बोगस आहे. २ हजार टेस्ट चे रिपोर्ट मिळाले नसले तरी शाम्पल घेतलेले २ हजार नागरिक समाजात फिरत आहेत. यातील ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येतील आणि त्याचा संसर्ग इतरांना झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला.कुठलीही लपवाछपवी न करता या 2 हजार टेस्टरिपोर्ट बाबत सत्य माहिती प्रशासनाने जनतेसमोर ठेवावी अशी मागणीही आमदार नितेश यांनी केली. 16 नोव्हेंबरच्या डीपीडिसी मिटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणार असल्याचे सांगत आमदार नितेश यांनी डिपीडिसी मिटिंग वादळी होणार असल्याचे संकेत दिले.
