आ केसरकर यांचा थंड दाहशदवाद व ढोंगीपणा लोकांनी ओळखला;आंबोली सरपंच गजानन पालेकर यांचा आरोप
*⚡आंबोली, ता.०८-:* आमदार दीपक केसरकर यांच्या थंड दहशतवाद आणि ढोंगी पणामुळे आंबोली घाटातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.तसेच माझे दुसरे घर म्हणून सांगून आंबोलीच्या जमिनींचे नेहमी सौदे बाजी करण्याचे उपद्व्याप सोडावे.आंबोली आंदण असल्यासारखे वाटेल तसे बरळत आहेत.जमीन प्रश्न सोडवण्याची भूलथापा लोकांनी ओळखल्या आहेत अशी टीका आंबोली सरपंच तथा भाजप चे जिल्हा कमिटी सदस्य गजानन पालेकर यांनी पत्रकातून केली आहे. आंबोली सरपंच पालेकर यांनी प्रसिध्दी पत्रक दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे, आमदार दीपक केसरकर यांच्या थंड दहशतवादामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.ठेकेदार फुकट खड्डे भरल्यासारखे दगड माती घालत आहेत. त्याचा उपयोग काही नाही.रस्त्याचे काम करताना हमी कालावधीतील काम करून घेणे ही त्या विभागाची जबाबदारी असते.मात्र ठेकेदार फुकट काम केल्यासारखे दाखवत आहेत. पालकमंत्री असताना त्यांनी ठेकेदारांची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करणार रस्ते टिकावू पाहिजे अशा बढाया मारल्या.मात्र त्यांच्याच ठेकेदारांनी केलेले रस्ते उखाडलेले आहेत म्हणजे हा थंड दहशतवाद आहे.आंबोली हे गाव एका टोकाला आहे.आणि इथून कोल्हापूर आजरा शिवाजी विद्यापीठ.सावंतवाडी हे चारही तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.या ठिकाणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र व्हावे.ते सोयीस्कर आहे.असे असताना आंबोली आंदण असल्यासारखे आंबोलीत ५० एकर जागा कुठची आणि कोण देणार ती जाहीर करावी.आतापर्यंत केसरकरांनी फुकटच्या जागा आंबोलीत बळकावल्या आहेत.आणि जमीन प्रश्न सोडवतो असे सांगून लोकांना बनवले आहे.त्यामुळे ढोंगी पणा करून लोकांना मूर्ख बनवू नये. आंबोली घाटातील रस्ते खड्डे बुजवून चांगले करणे हे आमदारांचे काम बांधकाम विभागाकडून करून घ्यावे अन्यथा या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा पालेकर यांनी पत्रकातून दिला आहे.
