नौका गेली चोरीला

दांडी समुद्रातील प्रकार;शनिवारी रात्री घडला प्रकार

*⚡मालवण ता.०७-:* मालवण दांडी येथील समुद्रात नांगरून ठेवलेली राजेश कांदळगावकर यांच्या मालकीची सातेरी कृपा (क्र. IND -5- NM-3451) ही नौका गायब झाली आहे. नौका कशी गायब झाली याचे गूढ अद्याप उलगडलेले नसून स्थानिक मच्छीमारांकडून समुद्रात या नौकेचा शोध सुरू आहे. मालवण दांडी येथील राजेश कांदळगावकर हे आपल्या सातेरी कृपा या नौकेद्वारे मच्छीमारी तसेच स्कुबा डायविंग साठी पिकअप बोट म्हणून वापर करतात. काल त्यांनी ही बोट समुद्रातच किनाऱ्यालगत नांगरून ठेवली होती. आज सकाळी कांदळगावकर हे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग पॉईंटकडे पिकअप पर्यंत करण्याण्यासाठी आपल्या नौकेच्या ठिकाणी गेले असता त्यांना नौका सापडून आली नाही. नांगराचा दोरखंड तुटून नौका भरकटत गेली असावी म्हणून नौकेचा समुद्रात शोध घेण्यात आला. मात्र ती सापडली नाही. नांगर तुटून नौका भरकटली असेल तर ती वाऱ्याबरोबर किनाऱ्याला लागू शकते. मात्र आसपासच्या कोणत्याही किनाऱ्यावर ही नौका सापडून न आल्याने नौका कोणीतरी पळवून नेली असावी असा अंदाज स्थानिक मच्छीमारांकडून व्यक्त होत आहे. या नौकेच्या गायब होण्याबाबत किनारपट्टीवरील गावांमध्ये कळविण्यात आले असून मच्छीमारांकडून समुद्रात या नौकेचा शोध सुरू आहे. ही नौका समुद्रात किंवा समुद्रकिनारी आढळून आल्यास राजेश कांदळगावकर (9766073415) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page