*बांदा- दोडामार्ग रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या सोमवारपासून हाती घेणार

संबंधित ठेकेदारांचे पत्रकार परिषदेतून आश्वासन

*⚡सावंतवाडी ता.०६-:* बांदा ते दोडामार्ग या रस्त्याच्या फेरनिविदा निघाल्या असल्या तरी आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून येत्या सोमवारपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेणार आहोत, असे आश्वासन संबंधित ठेकेदारांनी दिले. बहुचर्चित बांदा ते दोडामार्ग या रस्त्याचे खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याच्या कामाच्या निविदा रद्द केल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितल्यानंतर आज संबंधित ठेकेदारांनी येथील पि. के. परब यांच्या कार्यालयांमध्ये या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठेकेदार प्रभाकर परब, भरत पाटील, रोहित नाडकर्णी, महेश पाटील आदी उपस्थित होते मागील तौक्ते वादळी पाऊस यामुळे भरलेले खड्डे वाहून गेले. त्यामुळे बांदा ते दोडामार्ग रस्ता नादुरुस्त झाला. त्यामुळे आंदोलने देखील झाली. गेल्या काही दिवसात लोकांना आणि लोकप्रतिनिधींना त्या रस्त्याचा त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असल्याचे प्रभाकर परब, महेश पाटील, रोहित नाडकर्णी, भरत पाटील यांनी सांगितले. आमदार दिपक केसरकर यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे असेही ते म्हणाले. सार्वजनिक बांधकाम कोकण प्रदेश मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात २८ ऑक्‍टोबर रोजी मुख्य अभियंता, आमदार दीपक केसरकर, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण आदींच्या उपस्थिती मध्ये या रस्त्याच्या कामांसाठी बैठक झाली. त्यावेळी आम्ही रस्त्यावरील खड्डे दिवाळीपूर्वी भरू असे म्हटले होते. मात्र कामगार उपलब्ध नसल्याने खड्डे येत्या सोमवारपासून भरणार आहोत असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page