पाडवा पहाट निमित्त नाट्यसंगीत

५ रोजी पहाटे मोती तलावनजीक ५.३० ला होणार सुरू

सावंतवाडी मोती तलावाच्या काठी श्रीराम वाचन मंदिरासमोर यंदाची पाडवा पहाट शुक्रवार दि ०५ रोजी पहाटेक ठिक ५.३० वाजता रंगणार आहे. दि. ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन असल्याने हा कार्यक्रम रंगभूमी समर्पित असा नाटयसंगीताचा असणार आहे. सर्व रसिकजनांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन नवरंगचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ठिक ५.३० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेचे अध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलनाने होईल. सदर कार्यक्रम नवरंग व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. गायक श्री. स्वप्नील गोरे हे श्री. भाई शेवडे-गोवा, श्री. प्रसाद गुळवणी-रत्नागिरी आणि रामदास कामत- मुंबई यांचे शिष्य असून सौ.दिव्या (शेवडे) पळसुले देसाई ही श्री. उमेश मेस्त्री-ठाणे व महेश कुलकर्णी – डोंबिवली यांची शिष्य ह्या वर्षीच्या गायनाचा भार सांभाळणार आहेत तर कार्यक्रमाची साथसंगत हार्मोनियम- श्री. निलेश मेस्त्री व तबला – श्री. किशोर सावंत हे साथ देणार आहेत ध्वनीक्षेपण. व्यवस्था- श्री.परेश मुद्राळे यांची असून कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन श्री.बाळ पुराणीक करणार आहेत .

You cannot copy content of this page