*⚡वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेसाठी सातत्याने नागरीकांकडून एम.बी.बी.एस. डॉक्टर कायम स्वरुपी मिळण्यासाठी होत असलेल्या मागणीनुसार सिंधुदुर्गातील सावंतवाडी-माजगाव येथील गृहिता हर्षद राव येथील कन्येने तर वेंगुर्ल्याची स्नुषा पवार यांना जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार आज दोन्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्विकारला आहे. डॉ. गृहिता राव यांनी ७ वर्षे रशिया या देशात राहून एम.बी.बी.एस. हि पदवी प्राप्त केली आहे. तसेच कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकिय रुग्णालयात कोरोना योध्दा म्हणून कामगिरी बजावलेली आहे. तर डॉ. पवार यांनी एम.बी.बी.एस. करुन उस्मानााबद येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा दिलेली आहे. या दोघांची सिंधुदुर्गात आरोग्य सेवा देण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार व नागरीकांच्या आरोग्य सेवा सुविधेचे गांभीर्य जाणून प्रशासनामार्फत तात्काळ नियुक्ती देण्यात आली आहे. या दोन्ही एम.बी.बी.एस.डॉक्टराचे आघाडी सरकारमधील स्थानिक पातळीवरील शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत परब, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा सदस्य नितीन कुबल या प्रमुख पदाधिका-यांनी उपजिल्हा रूणालयाच्या ठिकाणी स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, वेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेश भोसले, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष तथा नगरपरीषद गटनेते प्रकाश डिचोलकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, नगरसेविका अस्मिता राऊळ, सुमन निकम, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शिवसैनिक अभियन मांजेरकर, डॅलीन डिसोजा तसेच उपजिल्हा रूणालयातील स्टॉफचे कर्मचारी यासह नागरीक उपस्थित होते.
वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दोन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती
