गटशिक्षणाधिकारी पिंगुळकर यांच्याहस्ते झाला सत्कार
*⚡वेंगुर्ला ता.०२-:* आसोली हायस्कूलमधील क्रीडा शिक्षक सुरेश शिरोडकर हे सेवानिवृत्त झाल्याने २९ ऑक्टोबर रोजी निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांच्या हस्ते त्यांचा सेवानिवृत्तीपर गौरव करण्यात आला. संस्थाध्यक्ष उदय धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी संजय गावडे, वैशाली रायशिरोडकर, राजेंद्र धुरी, चंद्रकांत बर्डे, संस्था सदस्य संदीप देसाई, गुरुनाथ घाडी, संजय धुरी उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक रमण किनळेकर, सीमा सावंत, सेक्रेटरी सदानंद गावडे यांनी शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. मुख्याध्यापक विशाखा वेंगुर्लेकर यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. विष्णू रेडकर यांनी आभार मानले. शिरोडकर यांनी आपल्या कार्यकालात सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आपण ऋणी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना श्रीमद्भावगत गीता व उपस्थित पालकांना ज्ञानेश्वरी भेट दिली. तसेच हायस्कूलला निधीच्या रुपात बहाल केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावना धुरी व जाधव यांनी परिश्रम घेतले.
