माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश …

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील देऊळवाडा येथील माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण यांच्यासह काही नागरिकांनी शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी सर्वांच्या हाती शिवबंधन बांधून भगव्या शाली घालत सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. यात पांडुरंग चव्हाण यांच्यासह कीर्ती लाड, सुभाष चव्हाण, अशोक मोर्वेकर, श्रीकृष्ण आंबेरकर या प्रवेशकर्ते यांचा समावेश आहे. यावेळी तालकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, किसन मांजरेकर, उमेश मांजरेकर, संमेश परब आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page