मालवण मधील विकासकामांचे उद्या खा. विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन..

मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहराला जिल्हा नियोजन मधून तीन कोटीचा निधी मंजूर होऊन यातील पावणे दोन कोटी निधीतून शहरात विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा रविवार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मालवण नगरपालिका इमारत परिसर आणि बलोद्यान विकसित करणे, नगरपरिषद हद्दीतील वायरी तारकर्ली रस्ता ते गांवकरवाडा ते श्रीपाद पाणंद जोड रास्ता तयार करणे आणि रस्ता मजबुतीकरण व काँक्रीटीकरण करणे, वायरी गर्देरोड परब घर ते मोंडकर रस्त्यास गटार व आधारभिंत बांधणे, भरड येथील जागेत वाहनतळ (पे अँड पार्क व्यवस्था) विकसित करणे, धुरीवाडा बागायतकर घर ते गारुडेश्वर मंदिरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, हॉटेल सायबा समोरील कोळंब खाडी लगतचा परिसर विकसित व सुशोभीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. या सर्व मंजूर कामांना कार्यरंभ आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page