कळसुलीत श्री स्वामी समर्थ मठाच्या बांधकामाचा 8 नोव्हेंबरला शिलान्यास

*⚡कणकवली ता ३०-:* प्रेमदया प्रतिष्ठानच्यावतीने कळसुली-हर्डी येथे प्रेमदया व्हिलेज रिसॉर्ट शेजारी श्री स्वामी समर्थ मठ बांधण्यात येणार आहे. या मठाचा शिलान्यास सोहळा श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण, शिष्यगण आणि भाविकांच्या उपस्थितीत सोमवार 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिपावलीचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त सायंकाळी 5 ते 6.30 या वेळेत स्थानिक भक्तांचा हरिपाठ, सायंकाळी 7 वा. नंतर किर्तनकार कैलास खैरे यांचे किर्तन होणार आहे तर रात्री 9 वाजता बुवा अभिषेक शिरसाट विरूद्ध बुवा समीर कदम यांचा डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page