दिवाळीत प्रदूषण नको

हिंदू जनजागृतीचे निवेदन

सिंधुदुर्गनगरी ता २९ फटाक्यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होते. फटाक्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात , तसेच अनेकांना गंभीर शारीरिक दुखापती झाल्या आहेत. फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे या प्रदूषणकारी फटाक्यांवर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीमार्फत करण्यात आली आहे. यावेळी अमेय परब, गजानन मुंज, रवींद्र परब व डॉ. अशोक महिंद्रे उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट निवळते आहे , तसेच पुन्हा लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे . कोरोना विषाणू हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर आक्रमण करत असल्याचे दिसून येते . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालणे हिताचे आहे. आतापर्यंत देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती . भारत सरकारने गेल्या वर्षी चीनी फटाक्यांवर बंदी घातली , तरी अवैध मार्गाने या फटाक्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले होते . हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अशा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या संदर्भात शासनदरबारी पत्रव्यवहारही केला होता. फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. या चिंधड्या अनेकांच्या पायाखाली , केरात , चिखलात , गटारांत पडलेल्या निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात , तसेच राष्ट्रीय अस्मितांवरही आघात होतात . खरे तर ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला , अशा राष्ट्रपुरुषांच्या चित्रांच्या चिंधड्या होणे , ही कृती देशद्रोहासमानच आहे . याविषयी हिंदु जनजागृती समिती वर्ष २००५ पासून वैध मार्गाने जनजागृती चळवळ राबवत आहे . या चळवळीच्या अंतर्गत समितीने फटाक्यांवरील वेष्टनांच्या माध्यमातून होणारी श्रीलक्ष्मी , श्रीकृष्ण , श्रीविष्णु आदी हिंदु देवतांची विटंबना रोखावी , तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस , लोकमान्य टिळक आदी राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखावा , यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली आहे . काही ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रारी करून अशी फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे ; मात्र शासनाकडून मर्यादित पत्रव्यवहाराच्या व्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्यामुळे देवतांच्या चित्रांच्या चिंधड्या उडतात , त्यामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या जातात. गेल्या वर्षी भारत सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी. जे विक्रेते अवैधपणे चिनी फटाक्यांची विक्री करतात , त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी , अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे अमेय परब, गजानन मुंज, रवींद्र परब व डॉ. अशोक महिंद्रे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page