*⚡मालवण ता.२९-:* रोटरी क्लब मालवण तर्फे सर्वांसाठी विनामूल्य अवकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६. ३० ते रात्री ८ वाजता मालवण धुरीवाडा येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंदार माईणकर हे दुर्बिणीद्वारे अवकाशातील चंद्र, ग्रह, नक्षत्र आदींचे दर्शन घडविणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब मालवण तर्फे करण्यात आले आहे.
मालवणात अवकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन
