*⚡मालवण ता.२९-:* श्रीमती लक्ष्मीबाई दत्तात्रय केळकर (वय १०१) राहणा-या आचरा पारवाडी यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आचरे पारवाडी येथील एकत्र नांदणा-या केळकर कुंटुंबीयांच्या त्या कुटुंब प्रमुख होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय १०१ वर्षे होते. आचरे येथील ऊपाध्याय पुरुषोत्तम उर्फ बंडू,चंद्रकांत केळकर यांच्या त्या माताश्री होत. त्यांचे पश्चात सहा मुलगे एक मुलगी, सुना , नातवंडे, पंतवडे असा परिवार आहे.अलिकडे आय्.पी एस अधिकारी झालेले सुब्रम्हण्यम केळकर यांच्या त्या आजी होत.त्यांना वाचनाची आवड होती.रामेश्वर वाचन मंदिराच्या चार वर्षापूर्वी संपन्न झालेल्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभाला ज्येष्ठवाचक म्हणून वाचनालया तर्फे त्यांचा खास सत्कार केला गेला होता. परोपकारी केळकर वहीनी म्हणून त्या आचरे पारवाडी परिसरात ज्ञात होत्या.
शतकीपार लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन
