शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे डॉ. अनिल तेली यांचे आवाहन.
*⚡मालवण ता.२९-:* गेल्या दोन दिवसांत काळसे गावात पाच गायी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेत काळसे गावातील गुरांना ” एच. एस.” ही लस देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आकस्मिक मृत झालेल्या गायीचा कोणत्या रोगामुळे मृत्यू झाला याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हा आजार बोटुलीझम सदृश्य असू शकतो अशी शक्यता डॉ. अनिल तेली यांनी व्यक्त केली आहे काळसे गावात गेल्या दोन दिवसात अज्ञात आजाराने पाच गुरे मृत्युमुखी पडली होती त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते आज सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनिल तेली यांनी काळसे गावाला भेट देत गुरांना ” एच. एस.” ही लस देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन सदर आजाराची इतर गुरांना लागण होऊ नये गुरुवार २८ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेसाठी डॉ. तेली यांना अजित प्रभु, अण्णा गुराम, रमेश मयेकर, रोहित परब संजय परब आणि गावातील इतर शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. यावेळी डॉ तेली यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सांगितले करताना की, प्रामुख्याने मृत जनावरांची हाडे चघळल्याने गुरांना हा आजार होतो. त्यामुळे काळसे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना पुढील आठ ते दहा दिवस गोठ्यातच बांधून ठेवावे. आणि ग्रामस्थांनी कोंबडी , कुत्रा, मांजर अथवा गुरे आदी जनावरे मृत झाल्यास त्यांचे मृतदेह उघड्यावर न टाकता ते लगेच जमिनीत पुरावेत. असे केल्यास सदर रोग लगेच आटोक्यात येईल असे आवाहनही सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल तेली यांनी केले आहे.