राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित…

वैभववाडी प्रतिनिधी करुळ घाटमार्ग ते तळेरे पर्यंतचे खड्डे 15 नोव्हेंबर पर्यंत भरुन रस्त्याची डागडुजी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता श्री कुमावत यांनी दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारचे करूळघाटतील उपोषण स्थगित केले आहे. तहसीलदार श्री रामदास झळके,पोलिस निरीक्षक अतुल जाधव, नायब तहसीलदार श्री.नाईक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता श्री कुमावत यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर ऊस शेतकऱ्यांनी आजचे उपोषण स्थगित केले. गगनबावडा तळेरे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.करुळ घाटात तर रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे वाहातूकीला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे वारंवार अपघात घडत असून वाहातूकीची कोंडी होत आहे.त्यातच यावर्षीचा ऊस गाळप हंगाम 30 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.वैभववाडी व कणकवली तालुक्यात शेतकरी मोठ्याप्रमाणात ऊस शेती करीत आहेत. येथील सर्व ऊस गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी. वाय . पाटील साखर कारखान्याला गाळपासाठी नेला जातो. माञ वैभववाडी ते गगनबावडा या मर्गावर रस्ता वाहतुकिस पुर्णपणे नादुरुस्त झालेला आहे. तसेच करुळ घाटात मोठ मोठे खड्डे पडलेले असून ऊस वाहतूक करताना ट्रक पलटी होण्याची दाट शक्यता आहे. मागीलवर्षी ऊस वाहतुकीचे ट्रक पलटी होण्याच्या तीन चार घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतक-च्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. घाट रस्त्याच्या या अशा अवस्थेमुळे गेले दोन – तीन वर्षे कोकणातील ऊस तोडणी घाट रस्ता दुरुस्त झाल्यानंतर जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली जाते. कोकणातील उष्णता आणि रानटी जनावरे पासून उसाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच अती उष्णतेमुळे ऊसाच्या वजनात घट होत आहे. पर्यायाने गेली दोन वर्षे शेतक-यांना घाटमार्ग दुरुस्त नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे.ही बाब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आधिका-यांना शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली आहे.त्यावर करुळ घाटमार्गातील खड्डे ५.नोव्हेबरपर्यंत तर तळेरे पर्यंतचा पुढचा टप्पा १५ नोव्हेंबर पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन श्री.कुमावत यांनी दिले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे बुधवारी करुळ घाटात होणारे साखळी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.यावेळी पञकार किशोर जैतापकर, सत्यवान तावडे,विशाल पावसकर,संजय मुरकर,डी.के.सुतार, किशोर कुडतरकर,धाकू पाटील, रमाकांत जैतापकर, विनोद जठार, महेश गोखले,समाधान साळुंखे, तात्या पाटील, संतोष पाटील, पांडुरंग पाटील बापल बोबाटे इत्यादीं शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You cannot copy content of this page