एस. टी .कर्मचारी संघटनांचे बेमुदत उपोषण सुरूच

मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठवण्याचा निर्धार

*⚡कणकवली ता.२८-:* महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले असून आजच्या दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. यावेळी एच.बी. रावराणे, विभागीय सचिव इंटक पांडुरंग गावडे, इंटक कणकवली आगार अध्यक्ष गौरेश लोकरे, कामगार संघटना विभागीय सचिव विनय राणे, कामगार संघटना विभागीय अध्यक्ष अनंत रावले, कामगारसेना महिलाअध्यक्ष मानसी परब, कायदेशीर सल्लागार प्रकाश साखरे, इंटक अध्यक्ष अशोक राणे, इंटक सचीव आबा धुरी, सुधीर सावंत,अविनाश दळवी, मधू भगत, संतोष चव्हाण, संजय सावंत, रमाकांत जाधव, कृष्णा कुडतरकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते. एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळी पूर्वी मिळाला पाहिजे, वाढीव घर भाडे ८, १६, २४ या दराने मिळाले पाहिजे, सर्व सण भत्ता १२५०० मिळालाच पाहिजे, वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के मिळावा, न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या तारखेला पगार मिळालाच पाहिजे आणि दिवाळी बोनस १५ हजार ५०० रुपये मिळालाच पाहिजे अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. .

You cannot copy content of this page