शिधापत्रिका धारकांना आधार नोंदणी व लाभार्थी पडताळणी करून घेण्याचे आवाहन

*⚡मालवण ता.२७-:* दरमहाचे धान्याचे वितरण ई-पॉस मशिनदवारे पारदर्शकरित्या होण्यासाठी शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी यांचे आधार संगणकीकरण जलदगतीने होणे गरजेचे आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत धान्याचा लाभ मिळण्याकरीता शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांची आधार नोंदणी (ईकेवायसी) व लाभार्थी पडताळणी (मेंबर व्हेरीफीकेशन) होणे आवश्यक आहे. त्याकरीता शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत दि. १५ नोव्हेंबर पर्यंत मालवण तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी यांनी संबंधित रास्त भाव दुकानात उपस्थित राहून आधार नोंदणी व मेंबर व्हेरीफीकेशन (लाभार्थी पडताळणी) करुन घ्यावी, असे आवाहन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सदर मुदतीत शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांनी आधार नोंदणी व मेंबर व्हेरीफीकेशन (लाभार्थी पडताळणी) करून न घेतल्यास अशा शिधापत्रिकाधारकास धान्य पुरवठा केला जाणार नाही. याकरीता मालवण तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थी यांनी आपले रेशनकार्ड व आधारकार्ड सहीत रास्तभाव धान्य दुकानात उपस्थित राहून ई-पॉस मशिनदवारे आपले आधार नोंदणी व मेंबर व्हेरीफीकेशन (लाभार्थी पडताळणी) ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण करावे असेही मालवण तहसिलदार अजय पाटणे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page