जिलेटिनचा स्फोट झाल्यामुळे कुडासे येथील दोघे युवक गंभीर जखमी

*💫दोडामार्ग दि.२२सुमित दळवी-:* नदीपात्रात आंघोळ करताना जिलेटिनचा स्फोट झाल्यामुळे कुडासे येथील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.हा प्रकार आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. कोणीतरी अज्ञाताने नदीपात्रातील मासे मारण्यासाठी हा प्रकार केला असावा असा ग्रामस्थांचा संशय आहे. दरम्यान त्या दोघांनाही अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती तेथील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली सुधीर हनुमंत देसाई वय 34 रा.कुडासे, किरण राऊत अशी त्या दोघांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की हे दोघेही मित्र तिलारी नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते त्यावेळी अचानक जिलेटिन चा स्फोट झाला यात किरण राऊत याचा हात जायबंदी झाला आहे जिलेटिन चा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांच्या ठिकाणी धाव घेतली व जखमींना येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात हलवले परंतु त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक महेंद्र घाग आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले आहे याबाबत पोलिस ठाण्यात काही माहिती प्राप्त होऊ शकली नाही

You cannot copy content of this page