कणकवली भूमि अभिलेखचा कारभारात सावळा गोंधळ…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी विचारला जाब; उपसंचालकांना कणकवलीत बोलावणार..

*💫कणकवली दि.२२-:* कणकवली भूमि अभिलेख कार्यालयात मोठा भ्रष्ट्राचार होत आहे.अनेक कामांमध्ये पैसे घेऊन चुकीची कामे केली जात आहे.हरकुळ खुर्द नंदकिशोर कुलकर्णी यांच्या जमिनीची चुकीची मोजणी करत हद्द दाखवली. त्यामुळे श्री. कुलकर्णी यांच्या मालकीची १५० कलमे तोडण्यात आली.त्याला जबाबदार कोण? मोजणी,कमी जास्त पत्रक व अन्य कामे रखडवून नागरिकांना त्रास का दिला जातो? असा जाब परशुराम उपरकर यांनी उपअधीक्षक प्रकाश भिसे यांना विचारत धारेवर धरले. तसेच उपसंचालक भूमी अभिलेख यांना कणकवलीत बोलावून या कारभाराबाबत लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कणकवली भूमि अभिलेख कार्यालयात म्हणजे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांचे नेतृत्वाखाली नागरिकांच्या समस्या बाबत धडक देण्यात आली.यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री,शेतकरी नंदकिशोर कुलकर्णी, संतोष सावंत, बाळकृष्ण कुलकर्णी, श्री. कोरगावकर यांच्यासह तालुक्यातील नागरिक व तक्रार उपस्थित होते. कणकवली भूमी अभिलेख कार्यालयात सावळागोंधळ सुरू आहे. अनेकांची कामे रखडून ठेवण्यात आलेली आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कमी जास्त पत्रक मोजणी व अन्य पक्षकारांना नाहक त्रास दिला जात आहे. एका प्रकरणात दिवाणी न्यायालयाचा आदेश असून देखील वाटप पत्र करण्यास टाळाटाळ केली जात आहे.हा न्यायालयाचा अवमान आहे.हे वाटप पत्र केव्हा होणार? यासह असंख्य प्रश्नांचा भडीमार नागरिक व मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रकाश भिसे यांच्यावर केला.त्यावेली ते निरुत्तर झाले होते. तसेच विविध प्रश्नांवर मूग गिळून गप्प राहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कणकवली भूमी अभिलेख कार्यालय संदर्भात लवकरच नागरिकांच्या तक्रारी घेऊन उपसंचालक यांना कणकवली बोलावणार आहे.त्यामुळे कणकवली तालुक्यातील नागरिक आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी कणकवली येथील मनसे कार्यालयात द्याव्यात.त्या तक्रारीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात आम्ही करणार आहोत. येत्या पंधरा दिवसात सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी भुमिअभिलेख उपसंचालकांना कणकवलीत बोलावणार असल्याची माहिती परशुराम उपरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page