*⚡मालवण ता.२७-:* झेप घे भरारी युवा मंच मालवण आणि चंद्रशेखर आझाद महाविद्यालयीन शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एक्स्पर्ट ब्रेन अकॅडमी पुणे चे व्याख्याते निलेश उत्तमराव जगताप हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सशुल्क नोंदणी आवश्यक असून त्यासाठी मंदार माईणकर ९४२०८८१०३९, दिनेश तोंडवळकर (९६७३०१८६३५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
