पाईप विकास संस्थेवर शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनल ची सत्ता…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पोईप विकास संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनल ने प्रतिस्पर्धीना धूळ चारून सत्ता प्रस्थापित केली आहे. या संस्थेच्या एकूण १३ उमेदवारांपैकी ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामध्ये शिवसेना पुरस्कृत पंकज वर्दम, मधू कोकरे, रेश्मा पोईपकर, तर ग्रामविकास पॅनल च्या शीतल भाट यांचा समावेश आहे. उर्वरित ०९ जागांसाठी दोन्ही पॅनलचे मिळून एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. संस्थेच्या ५३१ मतदारांपैकी २१७ मतदारांनी मतदान केले असून ना. मा. प्रवर्ग मधून उभे असलेले शिवसेना पुरस्कृत उमेदवार पूनेश सत्यवान जाधव यांनी ग्रामविकास पॅनेलचे उमेदवार सोमा रामचंद्र जाधव यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. तर सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटातील दुरंगी लढतीत आठ पैकी आठही जागांवर शिवसेनेचे गाव विकास पॅनेलचे आठही उमेदवार संतोष हिवाळेकर, अरुण माधव, दिगंबर माधव, विठ्ठल नाईक, नारायण पालव, राजेंद्र पालव, भिवा पारकर, विलास सांडव यांनी प्रतिस्पर्धी यांचा दारुण पराभव करीत विजय संपादन केला आहे. यामुळे पोईप विकास संस्थेवर १३ पैकी एक उमेदवार वगळता १२ जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम व नियोजन पॅनल प्रमुख गोपीनाथ पालव, युवासेना जिल्हा उपाध्यक्ष पंकज वर्दम, सत्यवान पालव, सुनील भाटकर, बाळा सांडव, विजय पालव, शिवरामपंत पालव, पांडुरंग चव्हाण यांनी घेतले यावेळी पोईप विकास संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांनी सत्ता परिवर्तन करून आमच्यावर टाकलेली जबाबदारी व विश्वास आम्ही निश्चितच पाच वर्षाच्या कारकिर्दीत सार्थकी लावून संस्थेच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांना विविध सेवा सुविधा देवून त्यांचा शेती व सर्वांगीण विकास करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे पॅनल प्रमुख गोपीनाथ पालव यांनी सांगितले तर युवासेना जिल्हा उपाध्यक्ष पंकज वर्दम यांनी आपणास निवडून दिलेल्या सर्व मतदारांचे व सर्व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार व्यक्त करीत अभिनंदन केले आहे

You cannot copy content of this page