स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेची ९ रोजी सभा

*⚡मालवण ता.२६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभूझाट्ये सभागृहात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. तरी कोरोना विषयक नियमांचे पालन करून सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुधीर धुरी व सचिव अमेय देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page