मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या अध्यक्षपदी मंगेश शेर्लेकर

*⚡मालवण ता.२६-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मालवण भरड येथील हॉटेल लीलांजली सभागृहात पार पडली. या बैठकीत सन २०२१- २४ या कालावधीसाठी संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मंगेश विठ्ठल शेर्लेकर तर सचिव पदी दामोदर मैनाजी गवई यांची निवड करण्यात आली. सेवानिवृत्त सेवक संघाची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष:- बाळकृष्ण रावजी माणगांवकर, सहसचिव – सुधीर शिवराम मालवणकर, खजिनदार – श्रीमती शुभदा विलास करंगुटकर, सदस्य- मनोहर बाळा जाधव, श्रीनिवास वसंत हडकर, अशोक नारायण ओटवणेकर, सूर्यकांत शिवा राजापुरकर, ज्योती दीपक बेग, सीताबाई राम छजलाने यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विद्यमान अध्यक्षांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page