सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या साहसी क्रीडा जिल्हाध्यक्ष पदी श्री मायकल डिसोजा यांची निवड

*⚡मालवण ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून शासन स्तरावर घोषित होऊन २३ वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला असून जिल्ह्याच्या साहसी क्रीडा प्रकारामध्ये म्हणावा तसा पर्यटन विकास झाला नसल्याने सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने या क्षेत्रात शाश्वत विकास साधण्यासाठी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने विशेष प्रयत्न केले जाणार असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या साहसी क्रीडा जिल्हाध्यक्ष पदी आंबोली येथील श्री मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी दिली मालवण कोळब येथील हॉटेल सायबा या ठिकाणी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाची बैठक संपन्न झाली त्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली . यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण, मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर ,श्री उत्तम नार्वेकर, श्री संतान अल्मेडा, श्री स्वरुप वाळके, श्री वामन पालेकर, श्री राकेश अमरूस्कर , श्री जेरोल्ड डीसोजा, श्री सहदेव सनाम , श्री पास्कु देसा तसेच अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री बाबा मोंडकर यांनी साहसी पर्यटन क्रीडा प्रकारामध्ये रोजगार निर्मिती व जिल्ह्यातील साहसी पर्यटन देश विदेशात पोचविण्यासाठी महासंघातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत तसेच या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले

You cannot copy content of this page