Headlines

मळेवाड येथे १३ रोजी संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

*सावंतवाडी : वरची मळेवाड मुळीकवाडी कलासागर रंगमंच येथे १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता श्रीधर अर्जुन मुळीक आणि परिवारातर्फे वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा निमित्ताने ‘मातृतीर्थ’ हा पौराणिक संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात पप्पू नांदोसकर, दामोदर जोशी, दत्तप्रसाद शेणई, आबा मयेकर, सुधीर तांडेल, सुभाष लोंढे, बंटी कांबळी, मोरेश्वर सावंत, महेंद्र कुडव, संतोष सुतार, ज्ञानेश्वर परब आदी दशावतारी कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना हार्मोनियम-पप्पू घाडीगावकर, मृदुंगमणी-बाबा मेस्त्री व चेतन मेस्त्री, तालरक्षक- संतोष गुडुळेकर संगीतसाथ करणार आहेत. या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीधर अर्जुन मुळीक आणि परिवारातर्फे करण्यात आले आहे

You cannot copy content of this page